भूम (प्रतिनिधी)- श्री गुरुदेव दत्त प्राथमिक व माध्यमिक विद्यालय भूम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी दीप पूजन करताना गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुंडे मॅडम व गुरुदेव दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीमान दत्ता भालेराव सर सचिव सतीश देशमुख सर सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थींनी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.