धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील शैक्षणिक व सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिजचे संचालक तसेच बील गेट्स जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा.सोमनाथ लांडगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार प्रदान नुकताच प्रदान करण्यात आला. अमरावती येथील अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रा.सोमनाथ लांडगे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. दि. 11 जून 2025 रोजी क्षितिज पॅलेस, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक,अमरावती येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातील जनसंपर्क अधिकारी डॉ.मनिष गवई व कमलताई गवई यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून मार्गदर्शन करण्यात आले. 

प्रदीर्घ व दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती भुषण गवई यांच्या आई कमलताई गवई, पोलीस उपायुक्त गणेशजी शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातील जनसंपर्क अधिकारी डॉ.मनिष गवई,राष्दवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत डावरे,साहित्यिक विष्णुसिंह सोळंकी, प्राचार्य डॉ. दिलीप काळे, अंबाई बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव माधुरी चव्हाण या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. 

 
Top