तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दि. 8 जून 2025 रोजी मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूर शाखा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

ज्येष्ठ सदस्य देवेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत पूर्वीच्या कार्यकारिणीला एकमताने मुदतवाढ देण्यात आली. साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अमर हरिश्चंद्र हंगरगेकर, उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी, कार्यवाह विजय देशमुख, कोषाध्यक्ष महेश गवळी, सहकार्यवाह ॲड. ओंकार मस्के, सह कोषाध्यक्ष महेश गुरव, संघटक संदीप गंगणे व तुषार सुत्रावे, कार्यालयीन प्रमुख दास पाटील, प्रसिद्धी प्रमुख प्रा. विवेक कोरे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.

कार्यकारणी सदस्य मंडळात पंडितराव जगदाळे, राजेश शिंदे, किरण हंगरगेकर, देवेंद्र पवार, भीमा सुरवसे, जीवनराजे इंगळे, अविनाश सराटे, आण्णासाहेब क्षीरसागर यांचा समावेश करण्यात आला. याप्रसंगी मराठवाडा साहित्य परिषद शाखेद्वारे लवकरच शहरातील वाचकांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरु करण्यात येत असल्याची माहिती शाखा अध्यक्ष अमर हंगरगेकर यांनी दिली. तसेच तुळजापूर शहरातून इ. 10 मध्ये मराठी भाषा विषयातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजनही शाखेच्या वतीने केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.  बैठकीचे सूत्रसंचालन ॲड. ओंकार मस्के यांनी केले. सदरील बैठकीस शाखेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top