तुळजापूर (प्रतिनिधी)- गोवंशाची हत्या हा कायद्याने गुन्हा असताना गाय व वासरांची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या एकावर तामलवाडी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई दि. 7 जून रोजी सकाळी 6.40 वाजेच्या सुमारास करण्यात आली. 

आरोपी वजीर अंबीर कुरेशी (वय 40 वर्षे, रा. काटी) याने काटी शिवारात शेतातील गोठ्यात गायींची कत्तल केल्याची माहिती तामलवाडी पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता त्यांना शेतात गोवंशीय जातीच्या गायी व वासरांची कत्तल केल्याचे व 25 चमडे घटनास्थळावर आढळून आले. यावेळी पोलिसांनी जनावरांच्या कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकुण 2 लाख 94600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील कारवाई तामलवाडी पोलिस स्टेशनचे सपोनी गोपाळ ठाकुर यांच्या मार्गदर्शन खाली तामलवाडी पोलीसांनी केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम  5(बी), 5(क)(1) 9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम  11(1)(के) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top