भूम (प्रतिनिधी)-  पुणे येथे होणाऱ्या 1 ली युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धांसाठी धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशन मुलांच्या संघाचे प्रशिक्षण शिबीर रविंद्र हायस्कूल भूम येथे संपन्न झाले. त्या शिबीरातून धाराशिव जिल्हाचा संघ निवड करण्यात आला. 

या संघामध्ये स्वराज मुळे, विश्वजीत सुपेकर, सुजय कुटे, साहिल सुरवसे, आदित्य जगदाळे, शिवकुमार सुपेकर, कृष्णा राठोड, शुभम जाधव, बालाजी शिंदे, सोमनाथ दळवी, वल्लभ राऊत, अथर्व आडे, मगर करण, ओम पवार या खेळाडूची निवड झाली आहे. या संघाच्या प्रशिक्षक म्हणून रविंद्र हायस्कूलचे क्रिडा शिक्षक तथा कबड्डी कोच अमर सुपेकर म्हणून तर संघ व्यवस्थापक निलेश व्हरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संघ शुभेच्छा देण्यासाठी रविंद्र हायस्कूल भुम  उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, कुटे, अक्षय बाराते, गणेश सुपेकर, कुणाला भारती, स्वप्निल सुपेकर, हर्षद बाबर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहकार्य महादेव साठे, धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मोहिते, अंबरनाथ राऊत, मोहन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

 
Top