धाराशिव(प्रतिनिधी)- व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे डी. एम. जंगम, श्रीमती एस. व्ही. कुंभार शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एस बी एन एम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, आर. पी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गाझी शेख, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, बीएड कॉलेजचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, डेअरी महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी वाघमारे, आयटीआयची व्यवस्थापक प्राध्यापक दत्तात्रय घावटे, लेखापाल योगेश मंडलिक, बालाजी मुंढे, प्रा. सुनील बनसोडे, प्रा. काका पोळ, प्रा. अंजुम शेख, तसेच कॅम्पस सर्व महाविद्यालयातील मधील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.