परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी  भाऊसाहेब दिवाने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रा.डॉ

 शहाजी चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.किरण देशमुख,भाऊसाहेब दिवाने. डॉ गजेंद्र रंदील यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ.सचिन चव्हाण यांनी मानले.

 
Top