तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेतील इयत्ता दहावी 2009बॅच विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मेळाव्यास आरंभ झाला.
हाँटेल स्काँयलँन्ड फंक्शन हॉलमध्ये घेण्यात कार्यक्रमातप्रारंभी प्रा. चेतन गायकवाड यांनी स्नेह मेळावा आयोजन करण्यामागे असलेला हेतू स्पष्ट केला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी पल्लवी मेहता, श्रीराम आगलावे, सहशिक्षक संघपाल कांबळे इत्यादींनी आपल्या मनोगतातून शालेय आठवणींना उजाळा दिला.
प्रशालेच्या माजी शिक्षिका श्रीमती जाधव मॅडम यांनी या स्नेह मेळावा व त्याच्या आयोजना पाठीमागे असलेली कल्पनेची प्रशंशा केली.
याप्रसंगी प्रशालेचे माजी शिक्षक व शिक्षकेतर वृंद श्री व्हरकट सर, सतीश कदम सर, वरपे सर, हंगरगेकर सर, रोचकरी सर,श्री मोकाशे सर, श्री बुवा सर, श्रीमती जाधव मॅडम व श्रीमती चव्हाण मॅडम इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चेतन गायकवाड सहशिक्षक प्रसाद वाले, प्रा, अतिश सुरवसे, श्री कुलदीप मगर, श्री विजय गंगणे, श्री सुनील विटकर, श्री अण्णा सोंजी आदींनी परिश्रम घेतले.
स्नेह मेळाव्यास दिनेश परमेश्वर, नितीन सूर्यवंशी, कुलदीप लोंढे, बाबा खपले, प्रमोद नागणे, संग्राम पाटील, विशाल रोचकरी, धीरज कदम, अश्विन घोरपडे, विकास जगदाळे, अमित जाधव, चंदन जाधव, सागर बाराते, अमित गुंडरे, शहाजी जगदाळे, लक्ष्मण नारायणकर, अण्णा वटणे, नितीन इंगळे, स्वाती रोचकरी, मंजिरी कुतवळ, गायत्री पेंदे, कविता बोबडे, पुनम रोचकरी, सारिका चव्हाण, शितल मुडदंगे, अनिता केवटे, निशा पाटील आदींची माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.