तुळजापूर (प्रतिनिधी)- 'महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व आमलदार कल्यानकारी असोशियन वतीने महाराष्ट्र राज्य सेवा निवृत्ती पोलिस अधिकारी व आमंलदार यांच्या राज्यव्यापी मेळावा गुरूवार दि. 5 जून रोजी सकाळी 11.00 वा. पुजारी मंडळ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे उद्धघाटन संजय पांडे (भा.पो.से.), माजी. पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई हे करणार असुन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद दायमा, (अध्यक्ष बिनतारी संदेश सेवानिवृत्त आ. संघटना छत्रपती संभाजी नगर) उपस्थितीत राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रमाकांत शिंदे (सेवानिवृत्त पो.उ.नि.) हे राहणार आहे. यावेळी निमंत्रक म्हणून आण्णासाहेब कदम, महादेव पवार (पुणे), जलबा गायकवाड (परभणी), नंदकुमार शेलार, (मुंबई), मोहन तोडकर (मुंबई), राजेंद्र सरवदे (सांगली), राजेंद्र कासार (रायगड),.चिमाजी बाबर (लातूर) मार्गदर्शक म्हणून उपस्थितीत राहणार आहे. तरी या मेळाव्यास राज्यातील सेवा निवृत्ती पोलिस अधिकारी व आमंलदार यांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन खंडेराव गांधले (अध्यक्ष), संजय व्होर्टे, ए. आर. उंबरे (उपाध्यक्ष), जी. एच. पवार, एम.डी.मुंडे (कार्याध्यक्ष), बनसोडे, क्षिरसागर (सचिव), साळुंके, पोतदार, कुरेशी, खटके, जगताप, घरबुडवे, शेख,
श्री, जाधव,. प्रदिप जाधव, चिलवंत (सल्लागार) श्रीमती. वारे, श्रीमती. रोंगे, श्रीमती. समुद्रे,सर्व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलिस आमंलदार धाराशिव जिल्हा व पोलिस बाँईज संघटना, धाराशिव जिल्हा यांनी केले आहे.