कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कनिष्ठ महाविद्यालय, कळंब येथील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक सुशील शेळके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
"Synthesis of Zirconia Based Mixed Oxide Solid Acid Catalyst, Characterization and Application in Organic Synthesis" या विषयावर त्यांनी यशस्वीपणे संशोधन पूर्ण केले. हे संशोधन डॉ.मेघशाम के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. हे संशोधन डॉ.मेघश्याम पाटील यांनी फ्रान्स आणि अमेरिका येथील आधुनिक प्रयोगशाळांमध्ये केलेल्या कार्यावर आधारित असून, नॅनो पार्टिकल बेस्ड मिक्स्ड ऑक्साईड सॉलिड ऍसिड कॅटलिस्ट या विषयाशी संबंधित आहे.
या कॅटलिस्टचा उपयोग कॅन्सर, एचआयव्ही यांसारख्या दुर्धर आजारांवरील औषधांचे उत्पादन जलद गतीने करण्यासाठी होणार आहे. संशोधनाच्या कालावधीत शेळके यांनी एकूण 6 शोधनिबंध प्रकाशित केले असून, त्यापैकी दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
पीएच.डी. तोंडी परीक्षेसाठी विषयतज्ञ म्हणून डॉ.लावंड (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर) यांनी काम पाहिले, तर परीक्षेचे चेअरमन म्हणून सुनील शंकरवार (विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) यांनी जबाबदारी पार पाडली.
या यशाबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, सहसचिव ए. आर. कुंभार, भास्कर साठे (मराठवाडा विद्यापीठ), के. पी. हवाळ (डॉ. बा. आ. म. वि. उपकेंद्र, धाराशिव), ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, सचिव अशोकराव मोहेकर, व्ही.एन.शेळके, शरद शेळके, सतीश मातने,संभाजी धुमाळ, संदीप देशमुख, विशाल जमाले ,रणजीत दांगट,राधाकृष्ण तीगोटे आदींनी अभिनंदन केले आहे. हे यश संस्थेसह संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे.