कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील विद्यार्थी संस्कार पंडित शिंदे (छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब चे प्राध्यापक श्री पंडित शिंदे यांचे सुपुत्र) देशभरातील प्रतिष्ठित अशा JEE Advanced परीक्षेमध्ये देशभरातून CRL Rank 89 प्राप्त करून IIT प्रवेशास पात्र झाल्याबद्दल मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, माजी नगरसेवक मनोहर हारकर ,पत्रकार रमेश अंबिरकर, निशिकांत आडसूळ, अखिल कुलकर्णी, प्रदीप रोटे, पद्माकर खराटे, सचिन गपाट, अमोल पवार,जनार्दन धुमाळे, दशरथ शेळके ,अशोक बिक्कड, समाधान भातलवंडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. मित्रपरिवाराच्यावतीने चि. संस्कार पंडित शिंदे व कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी संस्कार चे वडील प्रा. पंडित शिंदे,आई सौ.सुरेखा शिंदे उपस्थित होते.कळंब शहर गुणवंतांची खाण आहे हे संस्कार ने सिद्ध केले आहे. कळंब शहर व परिसरातील क्रीडा शिक्षण तसेच यूपीएससी एमपीएससी विविध स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी यश मिळवत आहेत ही खूप भविष्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.