भूम (प्रतिनिधी)- भूम शहराचे  माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी आजतागायत विकासात्मक धोरण अवलंबून राजकीय,सामाजिक क्षेत्रात जसा वेगळा ठसा उमटवला आहे अगदी त्याच प्रमाणे शेती,दुग्धव्यवसायात देखील नानांनी एक वेगळेपण दाखऊन दिले आहे.नानांनी शेती आणि दुग्धव्यवसाय याची नियोजनबध्द सांगड घालून पशुधनासाठी केलेला उत्कृष्ट निवारा,पशुधनासाठी आहाराचे केलेले योग्य नियोजन,पशूंची देखभाल करण्यासाठी केलेले नियोजन,पशुधन निरोगी राहण्यासाठी घेतलेली काळजी या गोष्टी विचारात घेऊन संगमनेर येथील सह्याद्री ऍग्रोवेट या कंपनीने आज नानांना “उत्कृष्ट गोपालक“ हा पुरस्कार प्रदान केला.

यावेळी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर सुरज जाधव, पशू वैद्यकीय अधिकारी संतोष गपाट, सोनई कॅटल फिडचे एरिया मॅनेजर शिवाजी जाधव,शुभम भांगे या सर्व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 
Top