तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर येथे राज्यशास्त्र आणि जिमखाना विभागात कार्यरत असणारे प्रा. संभाजी शिवाजीराव भोसले हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती समारंभात बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा. संभाजी भोसले सर यांनी बालाघाट शिक्षण संस्थे विषयी आपली कृतज्ञता व्यक्त करत या पुढे ही महाविद्यालयाच्या प्रगती करिता योगदान देणार असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड हे होते.तर प्रमुख उपस्थिती मधे उपप्राचार्य डॉ. प्रविण भाले, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे,माजी प्राचार्य डॉ. जे. एस. मोहिते तसेच प्रा. संभाजी भोसले यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई भोसले,अर्धांगिनी कोमल भोसले,बंधू सुभाष भोसले, जावई विजयसिंह देशमुख, सून सौ.मयुरी शिवतेज भोसले, कन्या सौ.शिवानी देशमुख त्याच बरोबर तुळजापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक तानाजी भोसले,बाळासाहेब भोसले शिवाजी बोधले, ,राजेश शिंदे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले तर आभार डॉ. सतीश महामुनी यांनी मानले.या सेवापुर्ती समारंभा करिता सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.