तुळजापूर (प्रतिनिधी)- आषाढी वारी निमित्त पंढरपूर कडे प्रस्थान करणारी श्री संत गजानन महाराज शेगाव यांची पालखीचे शुक्रवार  दि. 27 जून रोजी तुळजापूर येथे आगमन झाले असता नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सपत्निक शुभहस्ते श्रींच्या पालखीचे मोठ्या उत्साहात भव्य स्वागत व श्रींच्या पालखीची पूजा करण्यात आली.

यावेळी कार्यालयीन अधीक्षक ढोलेसाहेब ,अभियंता अतुल तोंडारे साहेब, स्वच्छता निरीक्षक दत्ता साळुंके ,लेखापाल शरयू पाटील मॅडम ,लेखापाल शरद पवार, संगणक अभियंता नम्रता शिंदे मॅडम ,भांडारपाल  बापूसाहेब रोचकरी ,सज्जन गायकवाड  साहेब, ज्ञानेश्वर जाधव ,प्रशांत चव्हाण, महेश गवळी,अमर ताकमोघे, संजय झाडपिडे, देविदास देवकते, विश्वास मोटे, मुजफ्फर शेख, बालाजी कोळी, खलिद सिद्दिकी, विशाल लोंढे, प्रशांत बुलबुले, सुनील पवार, बालाजी जाधव, सुभाष चव्हाण, बालाजी चौधरी, सुरज गाडे, श्रीराम मोगरकर, जयराम माने, अग्निशामन संपूर्ण टीम व इतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top