भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील गोलेगाव जवळील भूम ते परंडा मार्गावरील निवासी आश्रम शाळेसमोरून जाणाऱ्या स्कार्पिओने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने वृध्द गंभीर जखमी होवून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 14 जून रोजी घडली.

भूमकडे वेगाने जाणारी स्कार्पिओने (क्रमांक एम एच 12 ई टी 6234) कल्याण सोपान यादव (वय 68, रा. गोलेगाव ता. भूम) हे लुना दुचाकीने (क्र. एमएच 25 एबी4768) ने भूमकडे जात असताना स्कार्पिओने दुचाकीला मागून धडक दिली. यात यादव गंभीर जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी स्कॉर्पिओची तपासणी केली असता मागील भागात 20 वासरे तोंड वपाय बांधून ठेवल्याचे आढळले. या वारसांना कोठे व कशासाठी नेण्यात येत होते याचा तपास सुरू आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून, चालकांविरूध्द वाहतूक नियमांचे उल्लंघन, निष्काळजीपणे चालवणे व अनधिकृत पशुवाहतुकीबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पशुधन विभागाचे डॉ. एन. ए. टकले, डॉ. आर. ए. जगदाळे, आर. आर. अंधारे यांच्यासह संपूर्ण टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वासरांची तपासणी करून त्यांना प्राथमिक उपचार दिले.


 
Top