तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटक येथील भाविक रमेश भिमाप्पा आरेप या जवानाने भारतीय सैन्यदलात भरती झाल्यानंतर आपल्या पहिल्या वेतनातून एकूण 21000 रुपये श्रीतुळजाभवानी चरणी अर्पण केले.

रमेश हे नुकतेच सैन्यदलात भरती झाले असून मराठी लाईट इन्फंट्री मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे वडील भिमाप्पा आरेप देखील याच रेजिमेंटरीमध्ये कार्यरत होते. आई तुळजाभवानी च्या आशीर्वादामुळेच यश मिळाल्याचे सांगत कृतज्ञतेची भावना म्हणून पाहिले वेतन अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले.

 
Top