तुळजापूर (प्रतिनिधी)- पुरातत्व विभागाच्या पथकाने शनिवार दि. 14 जून रोजी श्रीतुळजाभवानी मंदीरात मुख्य, सिंह, भवानी शंकर या तीन गाभाऱ्यासह मंदीर परिसरात मंदीर संस्थान स्वानिधीतुन चालु असलेल्या विकास कामांची पाहणी केली.

पुरातत्व विभागाचा यापुर्वी दोन पथकाने मंदीरची पाहणी केली होती. शनिवारी पाच जणांचे तिसरे पथक येवुन त्यांनी मुख्य मंदीर गर्भगृहासह विविध विकास कामांची पाहणी केली. या तिन्ही पथके एकत्रितपणे अहवाल तयार करुन तो राज्य पुरातत्व विभागाला सादर करणार आहेत. सदरील अहवाल पंधरा दिवसात मंदीर समिताला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या नव्यानेच  चोपदार दरवाजा समोरील येथे दगडी शिळेला आडवी चिर पडल्याने लावलेल्या सपोर्टची पाहणी केली.तसेच मंदीरातील विविध गर्भगृहातील आडवे भीम खांब यांना चिरा पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर या पथकाची पाहणी विशेष मानली जाते. यामुळे मंदीर जिर्णोध्दार बाबतीत चित्र स्पष्ट होणार आहे. भवानीशंकर गाभाऱ्याचा व सभा मंडपाचा तसेच चोपदार दरवाजा येथे दगडी शिळेला लावलेल्या सपोर्टची पाहणी केली. चालू असलेल्या संपूर्ण विकास कामांचा आढावा घेतला.

 
Top