भूम (प्रतिनिधी)-  भूम आगाराच्या रोजच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना एसटी कडून आज सुखद धक्का मिळाला उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक दोन च्या वरिष्ठ अधिकारी अनघा बारटक्के यांनी  भूम आगारास अचानक दिली भेट दिली आहे. यावेळी विभाग नियंत्रक विनोद भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अभयसिंह देशमुख, प्रभारी आगारप्रमुख श्रीकांत सुरवसे उपस्थित होते.

दि. 5 जून रोजी धाराशिव येथे एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीस आलेल्या बारटक्के मॅडम यांनी भूम आगारा बाबत प्रवाशांच्या तक्रारीचा व आलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांचा सोक्षमोक्ष करण्यासाठी भूम आगारात प्रत्यक्ष येऊन  येथील आगाराची तपासणी  केली व महत्त्वाच्या सूचना देवून भूम सर्वोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली .यावेळी विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान एसटीचे वरिष्ठ अधिकारी आज आगारात असतानाही रामभरोसे कारभार पुन्हा एकदा दिसून आला. यामध्ये आगारातून आंतरराज्य जाणारे एकमेव बस भूम - हैदराबाद गाडी दोन तास लेट तर भूम-नगर-पुणे ही गाडी रद्द झाली आहे. दरम्यान आगारामध्ये बी एस सिक्सच्या अकरा बसेस आहेत. त्यामधील दररोज एक किंवा दोन गाड्याया बस सेन्सर असल्यामुळे भूम आगारात दुरुस्त होत नाहीत. त्या गाड्यांना आळणी येथील शोरूम मध्ये दुरुस्त करण्यासाठी घेऊन जावे लागते. यामुळे आगारातील उत्पन्नावर परिणाम होत आहे. याबाबत वरिष्ठांनी भूम येथील आगारात सदर बसेसच्या दुरुस्त्या कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.


संभाजीनगर येथील महाव्यवस्थापक यांनी भूम आगारास भेट दिली. यादरम्यान लांब पाल्याचे गाडीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लवकरच नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

श्रीकांत सुरवसे

प्रभारी आगार प्रमुख 

 
Top