धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक पाऊल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत 11 हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम नूतन प्राथमिक विद्यामंदिर,धाराशिव येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा उद्देश सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे हा होता.
कार्यक्रमात एकूण 1840 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून प्रेमाताई पाटील सरचिटणीस, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये आदित्य सुधीर पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव हे उपस्थित होते. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच नूतन प्राथमिक विद्यामंदिर,धाराशिव तर्फे भविष्यातही असे उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. आदित्य सुधीर पाटील यांनी सांगितले की, “शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. गरजूंना शिक्षणाची साधने पुरवणे हे आमचे सामाजिक कर्तव्य समजतो.” या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, शिक्षकशिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.