तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात  सेरेंटिका रिन्यूएबल्स यांच्यावतीने वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यार्ड मधील  विविध खात्यांनी वृक्ष लागवड करत ते वृक्ष जोपासण्याची शपथ घेतली.यावेळी निवृत्त सहाय्यक जिल्हा दंडाधिकारी सुनील यादव,निवृत्त सहाय्यक जिल्हा दंडाधिकारी शिवाजी शिंदे, निवृत्त तहसीलदार व्हि.एस.पवार, सेरेंटीका रिन्यूएबल्स चे असिस्टंट वाईस प्रेसिडेंट तथा प्रकल्प प्रमुख सुरजीत नारायण यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील सेरेंटिका रिन्यूएबल्स  यांच्या विविध यार्ड मध्ये तसेच कॉलिंग सबस्टेशन मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. 

सुनील यादव तथा शिवाजी शिंदे यांनी सेरेंटिका रिन्यूएबल्स यांनी पुढाकार घेऊन अत्यंत स्तुत्य कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल आस्थापनातील अधिकाऱ्यांचे कौतुक केले. सेरेंटीका रिन्यूएबल्स हे पुनर्वापरायोग्य अक्षय ऊर्जा निर्मिती करून कार्बन उत्सर्गाला अटकाव घालत असल्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करत असल्याची भूमिका उपस्थित मान्यवरांनी मांडली. तूर्तास सेरेंटिका रिन्यूएबल्स धाराशिव जिल्ह्यात पवन चक्कीच्या माध्यमातून अक्षय ऊर्जा निर्मिती करत आहेत. हे करत असताना पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने तज्ञ समितीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण प्रणाली राबवली जाते. यामध्ये जलस्त्रोत, वन्यजीव आवास, वन्यजीव, वृक्ष प्रजाती यांना कुठल्याही प्रकारची क्षती न होण्याची काळजी घेतली जाते. तसेच तज्ञ वन्यजीव अभ्यासकांच्या माध्यमातून कार्यान्वित पवनचक्कीमुळे पक्षी, वटवाघुळे यांना हानी न पोचवण्याची काळजी घेतली जाते. पवनचक्की उभारण्याच्यापूर्वी तसेच उभारण्याच्या वेळेस आणि कार्यान्वित झाल्यानंतर पर्यावरणास धक्का लागू नये यासाठी सेरेंटिका रिन्यूएबल्स काटेकोर पणे काळजी घेत असतात. तसेच या ऊर्जा प्रकल्पामुळे हवेचा दर्जा उत्तम राखण्यासाठी व कमीत कमी ध्वनी प्रदूषण होण्यासाठी किमान सहा महिन्यातून एकदा तज्ञ समिती सर्वेक्षण करत असते. 

यापूर्वी सेरेंटिका रिन्यूएबल्स यांनी 2 हजार वृक्षांची लागवड केली आहे. या व्यतिरिक्त दर शनिवरी आस्थापनातील प्रत्येक कर्मचारी पोलिंग सब स्टेशन तसेच यार्ड मधील प्लास्टिक वेस्टेज आजूबाजूच्या शेतांमध्ये जाऊ नये यासाठी श्रमदान करतात. अग्रनामांकित वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प उभारणीच्या वेळेस निर्माण होणारे प्लास्टिक वेस्टेज नष्ट केले जाते. प्लास्टिक मुक्त वातावरणासाठी सेरेंटिका रिन्यूएबल्स कटिबद्ध असल्याची भूमिका हे आस्थापन त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत आहे.


 
Top