भूम (प्रतिनिधी)- सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव व शिवसेना वैद्यकीय  कक्ष धाराशिव जिल्हा, यांच्या संयुक्त विद्यमानाने  भूम येथे ग्रामीण रुग्णालयात जागतिक पर्यावरण दिन उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव प्रताप सरनाईक, आ.प्रा डॉ तानाजीराव सावंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या संकल्पनेतून व शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, वैद्यकीय कक्ष संपर्कप्रमुख सचिन मांजरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पिंपळ, चिंच,कारंजा, अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.

निसर्ग आपला श्वास आहे, पर्यावरणाचे करा रक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण त्याचे रक्षण आपली जबाबदारी आहे. या उपक्रमासाठी वृक्षारोपण चा शुभारंभ शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ सुजित नायकल,वैद्यकीय अधिकारी डॉ.खराडे, दंतरोग तज्ञ डॉ.अमोल कुटे, आदर्श शिंदे, समुपदेशक सूर्यकांत तटाळे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 
Top