तुळजापूर (प्रतिनिधी)- संत तुकाराम महाराज यांचे 10 वे वंशज ह.भ.प. सच्चीदानंद महाराज मोरे-देहूकर आणि 11 वे वंशज ह.भ.प. ऋषिकेश महाराज मोरे-देहूकर यांनी आज सहकुटूंब श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. मंदिर संस्थान कडून त्यांचा देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे व अभिजित तेरखेडकर उपस्थित होते.