भूम (प्रतिनिधी)- जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय ,विधीज्ञ मंडळ भूम यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 9 जून रोजी विधीज्ञ कक्षामध्ये सर्व नवीन न्यायाधीशांचा स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी बी. जी.धर्माधिकारी (जिल्हा न्यायाधीश भूम ) बी . डी .पंडित (दिवाणी न्यायाधीश व .स्तर भूम ) आर. डी. (दिवाणी न्यायाधीश व स्थर ) ए. बी.जोंधळे (दिवाणी न्यायाधीश क स्तर ) ए. एस. मते (दिवाणी न्यायाधीश क स्थर ) ॲड .पंडितराव ढगे, ॲड .अमित मोटे , ॲड .शब्बीर सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमांमध्ये ॲड .गुळवे, ॲड .धनंजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड .विलास पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड .सोमनाथ शिंदे यांनी केले.