तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने भाविकांना आता मोतीचुर लाडूचा प्रसाद वाटप केला जाणार आहे. यासाठी पुण्याचा सुप्रसिद्ध मिठाईवाले चितळे बंधुशी करार करण्यात आला आहे.

श्री बालाजी संस्थान, शिर्डी साईबाबा संस्थान धर्तीवर मोतीचुर लाडूचा प्रसाद म्हणून देविदर्शनानंतर भक्तांना मिळणार आहे. श्रीतुळजाभवानी संस्थानने या बाबतीत स्थानिक पुजारी वृदांशी चर्चा करुन प्रसाद म्हणून मोतीचुर वाटप करण्याचा निर्णय मंदीर संस्थान ने घेतला. या पुर्वी ही मंदीरात प्रसाद म्हणून लाडू वाटप केले जात होते कालांतराने ते बंद झाले होते. त्यानंतर पुजारी मंडळाशी चर्चा करुन अखेर मोचीचुर लाडूचा भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्याबाबतीत निर्णय झाला. पुण्याचे सुप्रसिद्ध मिठाईवाले चितळे बंधुशी अखेर करार करण्यात आला. या निर्णयाचे भक्तांमधुन स्वागत होत आहे.

 
Top