तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सरडेवाडी ते मंगरुळ ते कुंभारी काँक्रीट रस्ता अंतर्गत मंगरुळ गावातुन तयार करण्यात येत असलेल्या सिमेंट रस्ता   काम रखडल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ञस्त ग्रामस्थांमधुन केली जात आहे. 

सरडेवाडी ते मंगरुळ ते कुंभारी काँक्रीट रस्ता काम होण्यासाठी ग्रामस्थांनी आवाज उठवल्याने तो मंजुर झाला. याचे काम सुरु झाले. नंतर माञ हे काम रखडले आहे. सध्या मंगरूळ गावातील कॉक्रीट गटार व रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे वाहनधारक व रहिवाशांना वाहतुकीस अडथळा होत आहे. वारंवार अपघात होत आहे. तसेच तेथील रहिवाशांनी या कार्यालयाकडे वारंवार काम पूर्ण करणे करिता मागणी केली आहे.  उपरोक्त कामे तत्काळ चालू करणे आवश्यक आहे. माञ गुत्तेदार काम चालु करीत नाही. याबाबत सा बां विभागाने ठेकेदारास वेळोवेळी तोंडी सूचना देऊन देखील अद्याप काम सुरू केलेले नाही ही बाब खेदजनक आहे. तथापि निविदा खंड 2 नुसार आपल्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी शिफारस का करू नये ? याचा खुलासा या कार्यालयास चार दिवसात देण्यात यावा. जर आपला खुलासा समाधानकारक नसल्यास आपल्यावर दंडात्मक कार्यवाहीची शिफारस करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी.अशी नोटीस सा बां विभागाने सदरील ठेकेदारास काढुन बरेच दिवस होवुन ही ठेकेदार काम चालु करीत नाही ठेकेदार बडी हस्ती असल्याने त्याचावर कारवाई बाबतीत चालढकल होत असल्याचा आरोप ग्रामस्थांन मधुन केला जात आहे.

 
Top