धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघाची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी विजयकुमार पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा अर्जुन तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड यांच्यासह संघटनेच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत मराठा सेवा संघाची महत्वपूर्ण बैठक शहरातील रायगड फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठकीत मराठा सेवा संघाच्या ध्येय धोरणांविषयी चर्चा करण्यात आली. सेवा संघाच्या सर्व 32 कक्षांची जिल्हा कार्यकारिणी नव्याने गठीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला.त्यानंतर मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यात आले.14 जणांनी जिल्हाध्यक्षपदासाठी आपले अर्ज निरीक्षकांकडे सादर केले. त्यातून समितीने सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदासाठी सतीशकुमार पाटील यांचे नाव जाहीर केले. तसेच कार्याध्यक्ष म्हणून विजयकुमार पवार, सचिव रोहित यादव यांची निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाच्या विभागीय उपाध्यक्षपदी महेश भगत, भास्कर वैराळे तर संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी बळीराम कवडे यांची निवड करण्यात आली.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष धर्मवीर कदम, देवेंद्र कदम, डी.आर. कदम, नंदकुमार गवारे, तुषार पाटील, महेश भगत, अतुल गायकवाड यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती रेखाताई पवार तसेच जिल्ह्यातील जुने, नवे अनेक सदस्य बहुसंखेने उपस्थित होते.

 
Top