धाराशिव (प्रतिनिधी)-  प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांना परमेश्वर मानून त्यांची आराधना केली.बापूजींनी उभारलेल्या प्रत्येक संस्कार केंद्रावर आपत्याप्रमाणे प्रेम केले.आणि त्या मराठवाड्यातील संस्कार केंद्राचा सर्वांगीण विकास करण्याचे काम प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे. असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी 28 जून 2025 रोजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या सेवा समारंभात केले. धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हा सेवा गौरव समारंभ पार पडला.

प्राचार्य डॉ.देशमुख यांच्या गौरव समितीचे अध्यक्ष म्हणून नानासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्या प्रास्ताविकात ते म्हणाले की, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी महाविद्यालयाच्या विकासात मोलाची भर घातली. प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख म्हणाले की, या गौरव ग्रंथासाठी एकूण 106 लेख प्राप्त झाले. या लेखाचे संपादन करत असताना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या  कामाची व्याप्ती खूपच मोठी असल्याचे दिसून आले.

याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, जेव्हा शैक्षणिक आणि शासकीय कामे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी आम्हाला सांगितली तेव्हा ही संस्था आम्हाला परकी वाटली नाही. आपल्याच घरातील एक संस्था आहे असे समजून आम्ही आमच्या परीने मदत केली आहे. यापुढे देखील आम्ही अशीच मदत करू असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी विचार मंचावर महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य बाळासाहेब शिंदे, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे उपस्थित होते. यावेळी विचार मंचावर, शिक्षक मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, विश्वास शिंदे, एम. डी. देशमुख, प्राचार्य डॉ.सौ. सुलभा देशमुख, प्राचार्य डॉ.रमेश दापके, संस्थेचे अर्थसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्रा.डॉ. सौ.विद्या देशमुख इत्यादी विचार मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैभव आगळे व आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी केले. तर आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.संदीप देशमुख यांनी मानले. 



कोण काय म्हणाले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र .कुलगुरू प्रो. डॉ.वाल्मीक सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदर्श प्रशासक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होय. असे प्रतिपादन केले.

आमदार कैलास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की,प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि कडक शिस्त हे समीकरणच जुळलेले होते. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.

मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे चालते बोलते विद्यापीठ आहे.त्यांचा आम्हा धाराशिवकरांना अभिमान आहे. असे ते म्हणाले. डॉ.किरण देशमुख, डॉ.प्रियांका देशमुख-बाहेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी आपले मनोगत केले.


समाधान वाटते- प्राचार्य देशमुख

प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी मी विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण समित्यांवर काम करताना धाराशिव येथील उपकेंद्र व महाविद्यालयासाठी खूप मोठा निधी मिळवून देण्याचे कार्य केले. रामकृष्ण परमहंस विद्यालयाला डीबीटी स्टार महाविद्यालयाचा दर्जा आणि नॅक मध्ये महाविद्यालयाला सर्वाधिक सीजीपीए सह ए दर्जा मिळवून दिला याचा मला मनस्वी समाधान वाटते. त्याचबरोबर प्रा. शिवाजीराव भोसले यांचा देखील सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला.

 
Top