तुळजापूर (प्रतिनिधी)- कोरोना या विषाणूचा नवीन व्हेरिएन्टचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत असल्याने सर्व भाविक भक्तांना या द्वारे आवाहन करण्यात येते की, श्री तुळजाभवानी मंदिरात श्री देविजींचे दर्शनास जात असताना भाविकांनी मास्क, सॅनिटायझर वापरावे. तसेच सोशल डिस्टंन्स ठेवावे. याची सर्व भाविक भक्त, पुजारी व नागरीकांनी नोंद घ्यावी.असे आवाहन अरविंद बोळंगे तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरातमहाराष्ट्र राज्यासोबतच शेजारील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यातून भाविक मोठया प्रमाणात श्री देविजींचे दर्शनासाठी तसेच कुलधर्म कुलाचार करणेसाठी तूळजापूर शहरात येत असतात. सध्या कोरोना या विषाणूचा नवीन व्हेरिएन्टचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत असल्याने मंदीर प्रशासनाने केलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.