भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील दत्तात्रय पांडुरंग शिंदे यांच्या मेंदू रोग या आजारावरील उपचार भागविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांचा मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपये उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर झाली.

शिंदे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नव्हता. उपचार करणे आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल ढगे यांनी जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. पांडुरंग धस यांनी तात्काळ सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री सहायता निधी मुंबई ऑफिसला पाठवली. व शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्याकडे सतत फाईल संदर्भात पाठपुरावा केला.

यावेळी  संपर्क प्रमुख सचिन मांजरे यांच्या सहकार्याने रुग्णाचा मदतीसाठी तत्काळ सूचना केल्याने या दत्तात्रय शिंदे रुग्णास  मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून एक लाख रुपये मदत मंजूर झाली. याबाबतचे मंजुरी पत्र शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांचा हस्ते हर्षद शिंदे यांना सुपूर्द केले.

नवनिर्वाचित शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते,व संपर्कप्रमुख सचिन मांजरे यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर  लवकरच विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असून, या शिबिरात तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सेवा विनामूल्य दिल्या जातील असे प्रतिपादन व्यक्त केले.


 
Top