तुळजापूर (प्रतिनिध)- येथील लातुर रोडवरील बसस्थानकात उमरगा येथील हणमत कोळी 50 हा मृतअवस्थेत 17 जुन 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता आढळला.
सदरील मयताचा उपजिल्हा रुग्णालय तुळजापुरची चिठ्ठी व गोळ्या सापडल्या. सदरील मयत रंगाने काळसर, सडपातळ, मध्यम उंचीचा, अंगात पांढरा शर्ट व काळी पँट घातलेले असुन सदरील मयताचा नातेवाईकांनी बीट अमंलदार गुरुनाथ लोखंड े(9421354450) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोनि अण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे. या प्रकरणाची अकस्मात मुत्यु म्हणून पोलिस ठाणे तुळजापूर येथे नोंद केली आहे.