भूम (प्रतिनिधी)-  भारतीय स्टेट बँकेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील भूम शाखेत दि. 21 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भूमीतील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. जी. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी बँकेचे शाखाप्रमुख राधेश्याम सोनटक्के, क्षेत्र अधिकारी युवराज नलावडे, रामेश्वर कांबळे, जूनियर असोसिएट उमेश लेंगरे, गौरव सस्ते, मनीष वाघमारे, हेडगार्ड बाळासाहेब लोखंडे, संतोष बसागरे, कृष्णकुमार दाभोळकर, आकाश मोरवणे, अक्षय बालगडे, आदींनी रक्तदान शिबिर पार पाडले. 


 
Top