कळंब (प्रतिनिधी)- कळंब तहसील च्या आवारात लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री. राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन दि.27 जुन 2025 रोजी शुक्रवार करण्यात आले. या आंदोलनात नवीन शिधापत्रिका धारकांना तात्काळ धान्य उपलब्ध करावे,महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ थेट कर्ज योजनेचे अर्ज तात्काळ निकाली काढण्यात यावे, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, लाभार्थ्याचे मानधन गेल्या 5 ते 6 महिन्यापासून मिळालेले नाही ते तात्काळ लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येऊन त्यांची उपासमार थांबविण्यात यावी, पी एम किसान सन्मान निधीच्या मानधनापासून अनेक लाभार्थी वंचित आहेत अशा लाभधारकांना तात्काळ लाभ देण्यात यावा, अनुसूचित जाती-जमातीतील लाभधारकांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी जाचक अटी रद्द करण्यात येऊन कुटुंबातील जात प्रमाणपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र लाभधारकांना विना विलंब जातप्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र कोणत्याही योजने करीता वर्ग करण्यात येऊ नये, घरकुले मंजूर झालेल्या लाभधारकांना जागा नसल्यास शासकीय पडीत जागेवर बांधकाम करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी, पी. एम. ई. जी. पी. व सी.एम.ई.जी.पी योजनेतील कर्ज प्रकरणे माफ करावीत, महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत बांधकाम मजूर यांची सदस्यत्व नोंदणी विना विलंब विना अडथळा करण्यात यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या सदरील मागण्यांचे निवेदन कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी स्विकारले. या वेळी तहसीलदार यांनी सदरील मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला. उपस्थितांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.मागण्या मान्य न झाल्यास लोकजन शक्ती पार्टी च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या वेळी लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे, शहर प्रमुख नागेश धीरे,तालुका अध्यक्ष भारत कदम,मुकेश गायकवाड, महावीर गायकवाड,दीपक हौसलमल,निवृत्ती हौसलमल, नटराज गायकवाड, बजरंग धावारे, सतीश चंदनशिवे, विशाल शिंदे, श्रीकांत हुलसुलकर यांच्या सह तालुक्यातील वृद्ध महीला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.