कळंब  (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात विधी सेवा समिती कळंब अंतर्गत गुणवत्ता कक्षा विभाग,राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्त भारत पंधरवडा साजरा करण्यात आला. 26 जून हा दिवस अमली पदार्थांचे गैरवापर व तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेने 26 जून हा दिवस घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयात कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आली होती. या शिबिराच्या प्रास्ताविक प्रा. अर्चना मुखेडकर यांनी केले. शिबिराच्या मार्गदर्शनपर भाषणांमध्ये विधिज्ञ मंदार  मुळीक यांनी मुलांना व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे याचे महत्त्व पटवून दिले. अमली पदार्थामुळे युवक हा आपल्या चुकीच्या मार्गाने प्रवास करतो, असे मत मांडले. 

प्रमुख अतिथी दिवाणी न्यायाधीश एन. एम. रेडी यांनी बाल तस्करी विषय सविस्तर माहिती देत याच्या विषयीचे कायदे व सामाजिक जबाबदारी अशी पार पाडावे याविषयी मत व्यक्त केले. तसेच दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए. डी. जाधव  यांनी अंमली पदार्थ गैरवार यावर मार्गदर्शनपर विचार मांडले .अध्यक्षीय समारोपात प्राचार्य हेमंत भगवान यांनी युवकाने अमली पदार्थाच्या गैरवापरापासून दूर राहून समाजातील गुन्ह्यांविषयी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमासाठी विधी सेवा समिती कळंबच्या वतीने न्यायाधीश ए.डी.जाधव, विधिज्ञ बी.बी साठे प्रमुख उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. दत्ता साकोळे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. मीनाक्षी जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.कमलाकर जाधव,प्रा. आप्पासाहेब मिटकरी, प्रा.विलास अडसूळ, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. संदीप महाजन, प्रा. जगताप, प्रा काझी, प्रा. भोसले, अधीक्षक हनुमंत जाधव सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे, संदीप सूर्यवंशी, अर्जुन वाघमारे  बहुसंख्या विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top