धाराशिव (प्रतिनिधी)- शहारातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे 2 जुन ते 12 जुन कलावधीत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरु आहे . परंतु कला व क्रीडा व इतर विषय शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण कुलातील 5 जुन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित साधून क्रीडा शिक्षक मालाजी काळे बलसुर, कलाध्या पक शेषनाथ वाघ धाराशिव ,कार्यानुभव शिक्षक गुरुलिंगप्पा मडोळे जेवळी ,क्रीडा शिक्षक विक्रम सांडसे व प्रशिक्षण कुलातील शिक्षक शिक्षिकांच्या संकल्पनेने वृक्षरोपण उपक्रम घेण्याचे नियोजन केले व प्राचार्य दयानंद जटनुरे , भोसले हायस्कुलचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे प्रशिक्षणाचे समन्वयक प्रदीप घुले, सुचिता जाधव सुलभक बाबासाहेब जगताप ,डॉ. विजय माने, मेघमाला देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . या प्रसंगी सेवक इमामदार प्रशिक्षणार्थी शिक्षक विष्णू इंगळे, नरेंद्र पाटील, दत्तात्रय इनामदार, तुकाराम यादव, निवृत्ती मुळे, देवकते, विजय कुलकर्णी,श्री पवार आदी शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते.