धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 21 जून हा  आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. इयत्ता नववीची योग प्रशिक्षित विदयार्थिनी कु . अंजली सांळुखे हिने सर्व विदयार्थ्यांसमोर  विविध प्रकारची योगासने सादर केले.

प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी आपल्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात योगाचे महत्त्व सांगून तन -मनाच्या उत्तम आरोग्यासाठी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. इयत्ता 8 वी ते 10 वीचे सर्व  विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या योगासनाचे प्रात्याक्षिक प्रशिक्षकासह केले. यावेळी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे, बी.बी. गुंड, क्रीडा शिक्षक विक्रम सांडसे, लक्ष्मण साळुंके उपस्थित होते.

 
Top