तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा येथे हजरत ख्वाजा आलम पीर दर्गा रहे यांचा 525 व्या उर्साची सुरुवात झाली असून दिनांक 12 जून रोजी संदल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच 12 जून रोजी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र महासचिव परवेज सिद्दिकी यांना दिर्घायुष्य लाभावे.  या दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजवादी पार्टीचे उस्मानाबाद धाराशिव जिल्हाध्यक्ष अमीर इब्राहिम शेख यांनी  प्रार्थना करून उपस्थित सर्व भाविक व नागरिकांना जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top