तुळजापूर (प्रतिनिधी)- नगर परिषद तुळजापूर शाळा क्रं. 1 हे अनेक दिवसापासून बंद असल्याने येथे कचरा व घाणीची साम्राज्य पसरल्याने ते लवकरात लवकर चालू करण्याची .मागणी शिवसेनेने मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, तुळजापूर शहरात यापूर्वी नगर परिषद तुळजापूर शाळा क्रं. 1 ही जुनी शाळा असुन, सदरील शाळेमधून शिकून गेलेले विद्यार्थी हे आज उच्च मोठया पदावर कार्यरत आहेत. परंतू मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव शाळा बंद केलेली आहे. आज खाजगी शाळेमध्ये अफाट डोनेशन घेत आहे. तरी सदरील डोनेशन हे गोरगरीब, शेतकरी, रोजंदारी करणारे मजूर व इतर सर्व नागरिक या भागात जिजामाता झोपडपट्टी आहे, कणे गल्ली आहे, नेपते गल्ली आहे, मातंग नगर आहे, दलित वस्ती आहे, अनेक गोरगरीब जनता या भागात राहतात, गोरगरीबाची आर्थिक परिस्थिती नसल्याने सदरील शाळा चालू करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच सदरील शाळा ही आज तारखेपासून आठ दिवसाच्या आत चालू नाही झाल्यास आपल्या कार्यालयासमोर लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा इशारा शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख अमोल जाधव.उपशहर प्रमुख बापुसाहेब भोसले रमेश चिवचिवे, मस्के प्रशांत,साळुंके गौरव सह पदाधिकारीनी दिला आहे.