नळदुर्ग (प्रतिनिधी)- तू नेहमी समाज सेवेमध्ये का भाग घेतोस, तु नळदुर्ग मध्ये राहतोस का? या करणावरून झालेल्या वादात एका तरूणाची कोयत्याने वार करून हत्या केली. बुधवारी साडेआठ वाजण्याच्यास सुमारास नळदुर्ग येथील शिवराज हॉटेल समोर झाली आहे. या प्रकरणी मयत सुर्यकांत सुरवसे यांची पत्नी करूणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात बाप व लेकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरा आरोपी जयकुमार गायकवाड याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

हत्येतील मुख्य आरोपी सोहम गायकवाड याला अटक केली. तर दुसरा आरोपी जयकुमार गायकवाड यांच्यावर सोलापूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे. तू नेहमी समाज सेवेमध्ये का भाग घेतोस, तू नळदुर्गचा आहेस, असे म्हणत जयकुमार गायकवाड व सुर्यकांत सुरवसे यांच्यात वाद झाला. या वादानंतर जयकुमार गायकवाड याने आपला मुलगा सोहमला बोलावून घेतले. सोहमने सुर्यकांत यांच्यावर वार केले. यामध्ये सूर्यकांत हे जागीच ठार झाले. मयत सुर्यकांत यांच्या पत्नी करूणा यांनी फिर्याद दिली. नळदुर्ग पोलिसात आरोपी सोहम गायकवाड व जयकुमार गायकवाड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. 

 
Top