धाराशिव (प्रतिनिधी)- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखुया स्त्री जन्माचे स्वागत करूया या सदराखाली सामाजिक उपक्रमातुन सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती, ईथिकल कमिटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवचे गणेश रानबा वाघमारे यांची कन्या अनोखी परी हिचा बारावा वाढदिवस शासकीय महिला रुग्णालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. तर नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या बाळाला नवीन कपडे व जन्म दिलेल्या मातेला साडी गुलाब पुष्प मान्यवरांच्या हस्ते देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले. एकुण बावीस कपडे व साडी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण,महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ.स्मिता गवळी, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ, डॉ.नमन डॉ.राहुल वाघमारे.डॉ.दिग्गज दाबके यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते जन्मलेल्या बाळाला व त्यांच्या मातेला नवीन कपडे व साडी देऊन मुली विषयी जनजागृती करण्यात आली. डॉ.स्मिता गवळी यांनी अनोखी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटले की, अनोखी परीच्या वाढदिवसानिमित्ताने आपण हा कार्यक्रम घेत आहोत. तो मुलीच्या जन्माचे स्वागतासाठी असुन गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम गणेश वाघमारे हे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त करतात. आपण भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केले आहे. संविधानाने आपणाला अधिकार दिले असुन मुलीच्या जन्माचे आनंदाने स्विकार केला पाहिजे. अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चव्हाण यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, आज रोजी आपण हा जो बेटी बचाओ बेटी पढाओ व स्त्रीभ्रूण हत्या रोखुया स्त्री जन्माचे स्वागत करूया या सदराखाली जो उपक्रम राबवत आहेत तो कौतुकास्पद आहे. या माध्यमातुन तुमच्या घरी,गावी गेल्यानंतर मुलगी का हवी याचे विषयी जनजागृती करा,मुलगा या मुलगी यात फरक करु नका, मुलगी ही ओझे नसून ती आधार आहे असे मत व्यक्त केले. अब्दुल लतिफ यांनी अनोखी परीला शुभेच्छा देत रुग्ण कल्याण समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली,. डॉ.दिग्गज दाबके यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, गणेश वाघमारे हे त्यांच्या मुलीचा अनोखी परीचा वाढदिवस हा सातत्याने दरवर्षी मुलीच्या जन्माचे स्वागत करुन एक कौतुकास्पद संदेश देत असुन आदर्श निर्माण करीत आहेत.डॉ राहुल वाघमारे यांनी ही अनोखी परीस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.रुग्णालयाच्या वतीने देखील आकर्षक अशी रांगोळी व सजावट करुन पुष्प बुके,मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. 

यावेळी अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधिक्षका डॉ स्मिता गवळी,उप निबंधक सहा.अधिकारी आशा कांबळे,डॉ.दिग्गज दापके,डॉ राहुल वाघमारे,डॉ.नोमानी,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ, सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती व ईथिकल कमिटी गणेश वाघमारे, बलभीम कांबळे,किसन घरबुडवे, संपतराव शिंदे,बाबासाहेब गुळीग,प्रदिप पांढरे,युसुफ सय्यद, विशाल घरबुडवे,श्रीकांत गायकवाड,आयुष वाघमारे,अनुष वाघमारे,अनोखी परी वाघमारे,संबोधी गायकवाड, परिचारिका कल्पना भालेराव,डॉक्टर, सिस्टर ब्रदर व, कर्मचारी सह इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अधिसेविका रिबेका भंडारी यांनी केले. तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले. शेख रौफ यांच्या शायरीतुन कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top