धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कायमच समाजकारण करत आलेली आहे लोकप्रिय कर्तव्यदक्ष जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी त्यांच्या विचाराचा वारसा पुढ नेत आपल्या संपर्क कार्यालयात १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून ढोकी व परिसरातील ५१ बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे व इतर साहित्य,शिष्यवृत्ती प्रमाणपत्र,मोफत आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले
यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, ढोकी ग्रामपंचायत सदस्या विमल डोलारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व बांधकाम कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.