धाराशिव (प्रतिनिधी)-  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर लढवावी असा निर्णय धाराशिव येथे घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून पक्षाचे सहकार्य मिळावे. अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीस पक्षाचे राज्य सचिव डॉ. अभिजीत मोरे, राज्य संघटन सचिव ॲड. मनीष मोडक, सोशल मीडिया प्रमुख  प्रा. नामदेव भागिले पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष राजपाल देशमुख, शहराध्यक्ष बिलाल रजवी, जिल्हा संघटक संजय दनाने, तालुका संघटक मुक्तार शेख, युवक जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद काजळे, सुरेश शेळके, कृष्णा कुमार यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top