धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.12 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यावेळी श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील तिन्ही शाखेतून प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच संस्कृत विषयांमध्ये 100 गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. 

यामध्ये विज्ञान शाखेमधून प्रथम क्रमांक कु. शेख मिजबा दाऊद, व्दितीय कु. कुलकर्णी विनीता दत्तात्रय, तृतीय क्रमांक बुर्ले अजिंक्य बिभीषण याने पटकावला. कला शाखेमधुन प्रथम पटेल दिशा रामप्रसाद, व्दितीय सांगळे अंजली गोपीनाथ, तृतीय भोसले श्रेया रवींद्र तर वाणिज्य शाखेमधुन प्रथम क्रमांक डोंगरे आरती अरुण, व्दितीय थोरात क्रांती सुधाकर व तृतीय क्रमांक कसबे ऋतुजा अविनाश या विद्यार्थिनीने पटकावला. संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन अनुक्रमे वाणिज्य शाखेतील कअमृता कदम व विज्ञान शाखेतून स्वामिनी गरड राज्यात प्रथम आल्या. तसेच  सिद्धी कुणाल निंबाळकर या विद्यार्थिनीने संगणकशास्त्र या विषयात 200 पैकी 192 गुण घेऊन विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. हा सत्कार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य एस. के. घार्गे, पर्यवेक्षक एम. व्ही. शिंदे आदींच्या हस्ते करण्यात आला.

 सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील, फोटॉन बॅचचे प्रमुख ए. व्ही. भगत, फेनॉमेनाल बॅचचे प्रमुख जे. एस. पाटील तसेच सर्व प्राध्यापक, विषयप्रमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. के. कापसे यांनी केले.

 
Top