तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे परिवहन तथा पालकमंञी यांनी बुधवार दि. 30 एप्रिल रोजी सांयकाळी तुळजापूरात येवुन तुळजापूर - धाराशिव शहरातील मलबा हाँस्पीटल समोर असणाऱ्या यात्रा मैदानची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार शिवसेना शहर प्रमुख बापुसाहेब भोसले, अमोल जाधव उपस्थितीत होते.
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील धाराशिव तुळजापूर रस्त्यावर मलबा हाँस्पीटल समोर याञा मैदानसाठी आरक्षित सात एकर जागा असून 1989 साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली होती. माञ काही मंडळीनी डुप्लिकेट पीआर कार्ड तयार करून यात्रा मैदान जागा विकली. या बाबतीत शहरातील विविध संघटना, महिला वर्गाने ही जागा भाविकांचा सोयीसाठी याञा मैदानसाठी ठेवावी कारण येथुन मंदीर अवघे पाच ते सात मिनीटे अंतरावर आहे. या परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या यात्रा मैदानाची पाहणी केली होती. ही दुसऱ्यांदा पाहणी केली. दि.30 एप्रिल रोजी तुळजापूर शहरात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री यांचे जंगी स्वागत केले. नंतर शहरातील महिला, पुजारी वर्ग तसेच अमोल जाधव यात्रा मैदानाबाबत पालकमंत्र्याशी चर्चा झाली.त्यावेळी पालकमंत्री यांनी आता या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.