कळंब (प्रतिनिधी)- येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा संलग्नित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दि. 5 मे रोजी सकाळी 10:00 वाजता दीक्षांत (पदवी प्रदान) समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत दीक्षित (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव), प्रमुख उपस्थितीमध्ये ज्ञान प्रसारक मंडळ सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, संचालक व अधिसभा सदस्य डॉ. संजय कांबळे, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव राहणार आहेत, तरी पदवीधर विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. हेमंत भगवान यांनी केले आहे.
याप्रसंगी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष (2023-24) च्या पदवीधर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सभागृहात सकाळी ठीक दहा वाजता उपस्थित राहावे. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.