तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागात “आयओटी विथ आरडीनो“ या तंत्रज्ञानावर एक दिवसीय कार्यशाळे संपन्न झाली.  या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आयओटी तंत्रज्ञानाची सखोल माहिती देण्यात आली तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात शिकवणी घेण्यात आली.  

कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून अष्टभुजा कम्प्युस्किलच्या संचालिका सोनाली मुळे यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे मूलभूत आणि व्यावसायिक पैलू समजावून सांगितले. कार्यशाळेच्या प्रारंभाला संगणक विभाग प्रमुख प्रा. वाघमारे डी. जे.यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विशेषतः शेतकरी आणि समाजासाठी उपयोगी कल्पना विकसित करण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असा संदेश याप्रसंगी देण्यात आला.  या कार्यशाळेत प्रा. शेख जे. एम. आणि प्रा. घोरपडे सपना यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन कुलकर्णी आणि महेश नवगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top