तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील हंगरगा तुळ येथील अडीच वर्षाचा समर्थ बालाजी चव्हाण हा खेळत असताना हौदात पडुन मरण पावल्याची खळबळ जनक घटना गुरुवार दि. 29 मे रोजी सकाळी 10 वाजण्याचा दरम्यान उघडकीस आली.
या घटनेची अधिक माहीती अशी कि, हंगरगा तुळ येथील बालाजी चव्हाण हे एमएसईबीत नोकरीस असल्याने ड्युटीस गेले. तर आई शेतात दूरवर काम करीत होती. समर्थ बालाजी चव्हाण हा खेळत खेळत सकाळी शेतातील पाण्यासाठी बांधलेल्या पाण्याचा हौदा जवळ आला. त्यात तो पडला. त्यात तो पडलेल्या अवस्थेत दिसला. त्यास तात्काळ वाहनांनी उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे आणले असता त्यास तपासणी अंती त्यास मयत घोषीत करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास एएसआय संजय लोखंडे करीत आहेत.