भूम (प्रतिनिधी)-  वाशी रोडवरील सह्याद्री डेअरी जवळ दुपारी आलेल्या पावसाने शेतातील वडाचे झाड कोसळल्याने थोड्याफार प्रमाणात पशुधन जखमी झाले आहेत. पडलेल्या झाडामुळे पत्र्याचे शेडचे व त्यामधील असलेल्या शेतीच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.

गुरुवारी  दुपारी दीडच्या सुमारासअचानक आलेल्या पावसाने संदीप संभाजी शेंडगे,हनुमंत बिभीषण भोळे या दोन्ही शेतकऱ्यांची झाडाखाली बांधलेली पशुधनास किरकोळ जखम झाली असून यामध्ये पशुधन वाचले आहेत. परंतु जवळच असलेले पत्र्याच्या शेडचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या शेडमध्ये असलेले शेतीची इतर साहित्य व कडबा कुट्टी मशीनचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी परिसरातील शेतकरी धावत येऊन बांधलेल्या जनावरांची सोडवणूक केली असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.


 
Top