भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील गिरवली येतील दि.3 एप्रिल रोजी गिरवली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दिव्यांग सेलच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
27 एप्रिल रोजी संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दिव्यांग सेलच्या विविध पदांवर निवडी करण्यात आल्या होत्या. या निवडी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री. देवीप्रसाद दायमा व मराठवाडा अध्यक्ष मदनकुमार इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
नुतन पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष म्हणून रियाज पठाण, महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मंगल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून याशिन बादेला व सुषमा पाटील, भूम तालुका अध्यक्षपदी वंदना देवकते तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून हनुमंत बोराडे यांची निवड झाली असून, यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून नविन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत सामाजिक न्यायासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग बांधवांसाठी कार्य करणाऱ्या या नुतन नेतृत्वामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.