तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत देण्यात येणाऱ्या व्हीआयपी पासेस तक्रारी नंतर बंद करण्यात आले आहेत. श्रीतुळजाभवानी सशुल्क दर्शन पासेस बाबतीत आरोप होवु लागल्यामुळे व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केल्याने या दर्शन पासेस प्रकरणी  जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी याच्या चौकशीसाठी पाच जणांची समिती नेमली आहे. आठ दिवसात अहवाल सादर करण्यास समितीस सुचना केल्या आहेत. या निर्णयाचा फटका व्हिआयपी नसताना त्याचा कोट्यातुन लाभ घेणाऱ्या बोगस व्हिआयपी ना बसणार आहे.

श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आपला नेता, पदाधिकारी आला कि मंदीर प्रशासनाकडुन व्हिआयपी दर्शन पास घेवुन मंदीर दर्शन करुन, फोटो काढत नंतर हेच फोटो सोशल मिडीयावर त्याचे समर्थक व्हायरल करीत. व्हिआयपी दर्शन करताना तासोनतास रांगेतुन उभे राहुन आलेल्या भाविकांना यांचा ञास देवीदर्शन करताना होत असे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे भाविकांनी मनापासून स्वागत केले. आता मंदीर विश्वतांचा बैठकीत व्हिआयपी नावे निश्चित केले आहेत. त्यानांच व्हिआयपी दर्शनाचा लाभ होणार आहे. यामुळे सुरक्षा यंञणेवरील ताण कमी होणार आहे. माञ याची अमंलबजावणी कशी केली जाणार यावर या निर्णयाचे यश अपयश अवलंबून असणार आहे.

 
Top