भूम (प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भूम तालूक्यातील 14 गावांमध्ये मोफत डोळे व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. वयोवृध्द महिला,पूरूष व तरूण नागरीकांना या डोळे तपासणी शिबीराचा फायदा झाला. या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरीकांकडून मिळाला. कारण या शिबीरामध्ये कुणाला सर्दी, खोकला ताप, डोकेदुखी ,अंगदुखी, असे आजार असतील तर लगेच मोफत औषध उपचार गोळ्या पेशंटला दिले जात होते. व मोफत डोळे तपासले जात होते. आणी जर पेशंटला जवळचा किंवा लांबचा नंबर लागत असेल तर लगेच नाममात्र 200 रूपये मध्ये त्या नंबरचा चष्मा दिला जात होता.
हे शिबीर खासदार ओमदादा निंबाळकर व जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. युवासेना जिल्हा प्रमुख चेतन बोराडे यांच्या साथीने हे शिबीर तालुका प्रमुख अनिलशेंडगे यांच्या नियोजनखाली पार पडले. हे शिबीर 14 दिवस 14 गावांमध्ये 1500 पेशंट ला या शिबिराचा फायदा झाला. 14 गावे- ऊळूप 90, ईट, माणकेश्वर 85, वालवड 255, वांगी बु 60, आरसोली 78, भूम 210, आंतरगाव 80, हिवरा 68, गणेगाव 70, पखरूड 78, चांदवड 124, बावी 102, तिंत्रज 55 व हे शिबीर पार पाडण्यासाठी सर्व शिवसेना युवासेना महिला अघाडी उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, गणप्रमुख आणी गावातील शाखाप्रमुख शिवसैनिक यांची मेहनत व योगदान लाभले.